उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या जिवाला धोका ? सुरक्षा व्यवस्थेत केली वाढ

101 0

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सध्या Z प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. मात्र तरीदेखील त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने आता देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून आता फोर्स 1 चे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो त्यांच्या सुरक्षित असणार आहेत.

चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत आत्तापासून फोर्स 1 मधील अत्याधुनिक शस्त्रधारी असलेले 4 कमांडो तैनात असतील तर एकूण 18 जवान हे एका वेळी फडणवीस यांची सुरक्षा करणार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण तापलेलं असताना अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याने राज्यभर चर्चांना उधाण आले आहे.

सुरक्षा वाढवण्याचे कारण काय ?

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयडीने गोपनीय रिपोर्ट सादर केला असून या रिपोर्टमुळे फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही सध्या अलर्टवर आहे. तर फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची शक्यता असल्याने ही सुरक्षा वाढवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Share This News
error: Content is protected !!