शिंदेंच्या शिवसेनेची 13 उमेदवारांची घोषणा तर दोन जागांवर मित्रपक्षांना पाठिंबा

101 0

विधानसभा निवडणुकांचे घोषणा झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे या यादीत 13 उमेदवारांना उमेदवारी मिळाली असून कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे तर राजेश टोपेंविरोधात हिकमत उडान यांना उमेदवारी मिळाली आहे.

हातकणंगलेच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने जनसुराज्य पक्षाच्या अशोकराव माने यांना पाठिंबा दिला आहे तर शिरोळ विधानसभा मतदारसंघात राजश्री शाहू विकास आघाडीच्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठिंबा दिला आहे.

Share This News
error: Content is protected !!