MVA SEAT SHEARING FORMULA: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर; आता 85 नव्हे तर लढणार ‘इतक्या’ जागा

173 0

MVA SEAT SHEARING FORMULA: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाविकास आघाडीतील जागांचा तिढा काही केल्यास सुटला जात नव्हता.

दोनच दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत 85 85 85 या फॉर्म्युला वर एकमत झालं

असल्याची माहिती दिली होती त्यानंतर महाविकास आघाडीचा आता आणखी एक नवीन फॉर्मुलावर तीनही पक्षांचं एकमत झालं आहे.

काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 85 ऐवजी आता 90 जागांवर लढणार असून

उर्वरित 18 जागा मित्र पक्षांना सोडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

याबाबतचा वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणाऱ्या सामना या दैनिकातून देण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!