बाबा सिद्दिकींनंतर बिश्नोई गँगचं पुढचं टार्गेट राहुल गांधी; ‘या’ अभिनेत्याचं वादग्रस्त विधान

205 0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि कामगार राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं स्वीकारलेली आहे. 

जो सलमान खानचा मित्र तो आमचा शत्रू असं बिश्नोई गँगनं म्हटलं होतं आणि यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात असताना आता एका अभिनेत्याचा वादग्रस्त विधान समोर आल आहे.

बाबा सिद्दिकी यांच्यानंतर आता बिश्नोई गँगचं पुढचं टार्गेट राहुल गांधी असल्याचं विधान अभिनेते बुद्धादित्य मोहंती यांनी केला आहे.

मोहंती यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

 

Share This News
error: Content is protected !!