BREAKING NEWS: निवडणूक जाहीर होताच महायुतीला पहिला झटका; महादेव जानकर महायुतीतून बाहेर

101 0

राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षांनं महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला असून राज्यात स्वतंत्रपणे 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याचा निर्णय जानकर यांनी घेतला आहे

महादेव जानकर हे गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु होती. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

महादेव जानकर वाढवणार महायुतीचे टेन्शन; विधानसभेला तब्बल इतक्या जागा लढवण्याची केली तयारी

Share This News
error: Content is protected !!