पुणे: राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहेत अशातच आता पुण्यातून राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील मिळून काँग्रेसचे पाच उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुणे शहरातील तीन तर पुणे जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये कसबा,शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट या पुणे शहरातील तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर या मतदारसंघांचा समावेश आहे.
पुणे शहरातील असणाऱ्या तीन मतदारसंघांमध्ये कसबा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे तर पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून माजी राज्यमंत्री रमेश बागवे आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक दत्तात्रय बहिरट यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
तर पुरंदर मतदार संघातून संजय जगताप आणि भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे या दोन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता आहे