विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच मुख्यमंत्री शिंदे यांना विदर्भात मोठा धक्का; ‘या’ आक्रमक महिला नेत्यांनं दिला राजीनामा

144 0

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आले असून महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदार संघासाठी एका टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करत असताना विदर्भातून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला असून विदर्भातील आक्रमक महिला नेत्या अशी ओळख असणाऱ्या प्रा. शिल्पा बोडखे यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

का दिला शिल्पा बोडखे यांनी राजीनामा?

शिल्पा बोडखे यांच्याकडे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख पदासह शिवसेनेच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी ही देण्यात आली होती मात्र आता शिल्पा बोडके यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे राज्यात महायुती म्हणून सरकार चालवत असताना पक्षातील काही नेते धार्मिक तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करत असतात. या नेत्यांवर कुठलेही कारवाई न करता त्यांच्या वक्तव्याचा समर्थन करणारे अनेक जण पक्षामध्ये दिसतात अशा परिस्थितीत पक्षात काम करू इच्छित नाही असं बोडके यांनी म्हटले आहे

शिल्पा बोडके  राजीनामा पत्र जसंच्या तसं

प्रति एकनाथ शिंदे साहेब (शिवसेना मुख्य नेते। मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य…

विषय:- शिवसेना प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पदावरून राजीनामा देण्याबाबत..

मा. एकनाथ शिंदे साहेब (शिवसेना मुख्य नेते) साहेब आपण राज्यात भरपूर विकासात्मक काम करत आहे तसेच साहेब आपण महायुती म्हणुन सरकार चालवत आहोत परंतु महायुती सरकार चालवितांना तिन्ही पक्ष हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहोत परंतु साहेब आपल्या सोबत असलेल्या पक्षातील काही वाचाळवीर वाट्टेल त्या भाषेत दुस-यावर टिका करतात कधी कधी धार्मिक तेढ निर्माण होईल कोणाच्या भावना दुखवेल याचा देखील विचार करत नाही. साहेब खरच आपल्याला शिकवलेल्या हिंदुत्वात दुस-याचा द्वेष करायला शिकवले जाते का..?? साहेब मी देखील हिंदु आहे परंतु माझ्यावर झालेल्या संस्कारात प्रत्येकाचा आदर करणे प्रत्येक समाजाचा सन्मान राखणे तसेच राजकारणात मतभेद असावे पण मनभेद असु नये असे शिकविले आहे हिच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे कित्येक दिवसांपासून असल्या वाचाळवीर नेत्याच्या वक्तव्याची चीड येते यांच्या या वक्तव्यामुळे तुम्ही केलेल्या कामाला कुठे तरी तडा जात आहे, वाचाळवीरानां आवर घालण्यापेक्षा त्यांचे नेते जलेबी सारखे शद्व घुमवत त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करतांना दिसतात त्यामुळे अश्या वातावरणात काम करण्याची मनापासून इच्छा होत नाही करिता मी आपल्या शिवसेना प्रवक्ता व पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे

…….जय महाराष्ट्र

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!