दहा वर्षांनी जम्मू-काश्मीरला मिळाला मुख्यमंत्री; ओमर अब्दुल्लांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

174 0

जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील नुकत्याच 90 जागांसाठी विधानसभांच्या निवडणुका पार पडल्या होत्या. 8 ऑक्टोबर रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले या निवडणुकांमध्ये जम्मू कश्मीर नॅशनल कॉन्फरन्सला स्पष्ट बहुमत मिळालं होतं.

त्यानंतर आज जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुला यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. कलम 370 आणि कलम 35a हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक झाली होती. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवत केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला ठरले आहे.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने मिळून ही निवडणूक लढवली होती. पण काँग्रेस नवीन जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये सहभागी झालेले नाही. काँग्रेसने नवीन सरकारमध्ये एका मंत्रिपदाची ऑफर नाकारली आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सुरिंदर कुमार चौधरी यांनी जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते सकिना इटू, जावेद अहमद राणा, जावेद अहमद दार आणि अपक्ष आमदार सतीश शर्मा यांनी कॅबिनेट मंत्रीपदी शपथ घेतली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!