Congress

महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा संभाव्य जाहीरनामा ‘TOP NEWS मराठी’च्या हाती; कोणत्या असणार महत्त्वाच्या घोषणा?

133 0

नवी दिल्ली: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत असताना नुकतीच राजधानी नवी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली.

या बैठकीला महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर चर्चा झाली असून काँग्रेसचा हा संभाव्य जाहीरनामा टॉप न्यूज मराठीच्या हाती लागला आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा?

  • महिलांना महिना दोन हजार रुपये देणार 
  • शेतकऱ्यांचं 3 लाखापर्यंत कर्जमाफ करणार 
  • महिलांसाठी स्त्री सन्मान योजना बस वाहतूक सेवा पूर्णपणे मोफत 
  • स्त्री सन्मान योजनेतून 25 लाख रुपयांचं विमा कवच 
  • बेरोजगारांना महिन्याला चार हजार रुपये देणार 
  • 6.5 लाख युवकांना भत्ता दिला जाणार 
  • दलित आणि अल्पसंख्याकांसाठी विशेष योजना 

काँग्रेस नेते, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सुमारे तीन तासाच्या बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यासह प्रमुख विषयांवर चर्चा झाली आहे

 

Share This News
error: Content is protected !!