SAD NEWS: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन

278 0

मराठी मनोरंजनसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली असून ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 57 वर्षी अखेरचा श्वास घेतला.

बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकिर्द सुरु करणाऱ्या या अभिनेत्याने मराठी सिनेसृष्टी गाजवून सोडली. नाटक, सिनेमा, मालिका अशा विविधांगी माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. माझा होशील ना ही अतुल परचुरे यांची अखेरची मालिका ठरली.

अतुल परचुरे यांनी काही महिन्यांपूर्वीच एक मुलाखत दिली होती ज्यामध्ये त्यांनी एक धक्कादायक माहिती दिली होती. त्यांनी मुलाखतीत सांगितलं होतं की, ‘जेव्हा त्यांना कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे समजली तेव्हा ते डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेले पण सुरुवातीला डॉक्टरांनी त्यांच्या आजाराचे चुकीचे निदान केले आणि त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळू लागली.’

अभिनय संपन्न गुणी कलाकाराला मुकलो

हरहुन्नरी, अभिनय संपन्न अभिनेते अतुल परचुरे यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. त्यांच्या निधनामुळे एका गुणी कलाकाराला आपण मुकलो आहोत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, बालरंगभूमी पासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी मराठी रंगभूमीवर आपल्या सहज, टवटवीत अभिनयाने छाप उमटवली. मराठी आणि हिंदी अशा दोन्हीतील नाटक, मालिका चित्रपट आणि जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी ओळख निर्माण केली. शाब्दिक, वाचिक विनोद यांमध्ये त्यांनी अंगभूत गुणांनी रंग भरले. त्यांच्या निधनामुळे एक गुणी, अभिनय संपन्न कलाकाराला आपण मुकलो आहोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे. परचुरे यांच्या असंख्य चाहत्यांपैकी एक म्हणून मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ईश्वराने त्यांना हे दु:ख सहन करण्याचं बळ द्यावी अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Related Post

संजय राऊत हाजीर हो! ईडीकडून संजय राऊतांच्या चौकशीला सुरुवात

Posted by - July 1, 2022 0
पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना हे समन्स बजावलं होतं. ईडीने 28 जून रोजी संजय राऊत यांना चौकशीला हजर…
Ajit Pawar

Ajit Pawar : अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते फुटले

Posted by - July 2, 2023 0
मुंबई : आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकिय भूकंप पाहायला मिळाला. यावेळी शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. यामध्ये…

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी

Posted by - August 1, 2022 0
मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर…

राणा दांपत्याचा मुक्काम कोठडीतच ! २९ एप्रिल रोजी सुनावणी

Posted by - April 26, 2022 0
मुंबई- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आजही दिलासा मिळालेला नाही. राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी…

महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम, पोलीस महासंचालकांनी सांगितली व्यूहरचना

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या भाषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल सतर्क झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *