राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी अन्न नागरी पुरवठा आणि कामगार राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आणि बिश्नोई गॅंग पुन्हा एकदा चर्चेत आली या बिश्नोई गॅंगचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात..
लॉरेन्स बिश्नोई गॅंगनं बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना असून काही दिवसांपूर्वी तुरुंगात असणाऱ्या बिश्नोई यानं जो सलमानचा मित्र तो आमचा शत्रू असं विधान एका मुलाखतीमध्ये केला होता आणि त्यामुळेच बाबा सिद्दिकी यांच्या खुनामागं बिश्नोई गॅंगचा सहभाग असेल असं बोललं जात आहे.
कोण आहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई याचा पंजाबमधील फिरोजपूर12 फेब्रुवारी 1993 रोजी जन्मलेला लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सचे वडील 1992 मध्ये हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. मात्र पाच वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी शेती सुरू केली. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे.
पंजाब विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेतही लॉरेन्सचा सहभाग
2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला. लॉरेन्सच्या रंगरुपामुळे त्याला गावात मिल्की असं म्हटलं जाई. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता यांना पाश्चिमात्य नावांची आवड होती म्हणून त्यांनी आपल्या पहिल्या मुलाचं नाव लॉरेन्स असं ठेवलं. लॉरेन्स बिश्नोई यांनं विद्यार्थी संघटनांच्या निवडणूका लढवल्या आपण विद्यार्थी नेता होतो आणि पंजाब-चंदीगढच्या राजकीय पक्षांनी आपल्याविरोधात खोटे खटले दाखल केले असं बिश्नोई म्हणत असतो. लॉरेन्स बिश्नोई गँग पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये अॅक्टिव्ह आहे.
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मोसेवालाच्या हत्येमागं बिश्नोई गॅंग
प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मोसेवाला यांच्या हत्येतही बिश्नोई यांचा सहभाग आढळून आला आहे. या प्रकरणी बिश्नोई गॅंगच्या सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांना पोलिसांनी अटकही केली आहे
सध्या लॉरेन्स बिश्नोई हा पंजाब मधील तुरुंगात असून तो तुरुंगातून आपले गॅंग ऑपरेट करतो असा आरोप होत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारामागेही बिश्नोई गॅंगचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय