माता न तू वैरीणी; प्रियकरासाठी आईने केला 30 वर्षीय मुलाचा खून

262 0

माता न तू वैरीणी; प्रियकरासाठी आईने केला 30 वर्षीय मुलाचा खून

आपल्याच पोटच्या मुलाचा अनैतिक संबंध जपण्यासाठी आईनेच खून केल्याचे दुर्दैवी घटना पुण्यात घडली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे या महिलेने आपल्या तीस वर्षीय मुलाला संपवलं. लोणीकंद पोलिसांनी सुमित्रा लालसिंग ठाकुर (वय ५५, रा. वाघमारे वस्ती, पेरणे फाटा) या महिलेला अटक केली असून तिचा प्रियकर प्रफुल्ल पुंडलिक ताथोड (वय ३५) याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

अनिल लालसिंग ठाकुर (वय ३०, रा. वाघमारे वस्ती, पेरणेफाटा, पेरणेगाव) असे खून झालेल्या मुलाचं नाव आहे. याबाबत अनिल यांचा भाऊ सुनिल लालसिंग ठाकुर (वय ३२, रा. पेरणेफाटा) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत अनिल ठाकूर हा काही नोकरी धंदा करत नव्हता आणि त्याला दारूचं व्यसन होतं. ज्यामुळे त्याचे त्याच्या आईशी वाद होत होते. त्यातच आई सुमित्रा हिचे त्यांच्याच परिसरात राहणाऱ्या प्रफुल्ल ताथोड नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. याविषयीची माहिती अनिलला समजली. तेव्हापासून तो सतत आईशी हे संबंध तोडण्यासाठी वाद घालत होता. असेच वाद या दोघांमध्ये गुरुवारी मध्यरात्री झाली. त्यावेळी प्रियकर प्रफुल्लच्या मदतीने सुमित्रा हिने अनिलच्या डोक्यात मोठा दगड घातला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

याविषयीची माहिती सुमित्राच्याच नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच सुमित्राने मुलाच्या खुनाची कबुली दिली. दरम्यान लोणीकंद पोलिसांनी तिला अटक केली असून प्रफुल ताथोड याचा शोध घेण्यात येत आहे.

Share This News
error: Content is protected !!