BREAKING NEWS: अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

203 0

राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असताना आता अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी हाती घड्याळ घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, बाबा सिद्दिकी, आनंद परांजपे आदी नेते उपस्थित होते.

सयाजी शिंदेंच्या प्रवेशानं पक्षाला ताकद मिळेल 

अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ताकद मिळेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

सयाजी शिंदे आता नेते बनतील 

सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री चक्र भुजबळ यांनी सयाजी शिंदे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतानाच आता सयाजी शिंदे सुद्धा नेते होतील अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पक्षप्रवेश करताच सयाजी शिंदेंकडे स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी

बॉलीवूडपासून टॉलिवूडपर्यंत सर्वच सयाजी शिंदे यांनी सर्वच भूमिकांमध्ये काम केलं असून एक प्रतिभा संपन्न अभिनेते अशी सयाजी शिंदे यांची ओळख असून सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाचा राष्ट्रवादीला नक्कीच फायदा होईल असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांचे स्वागत केलं व आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सयाजी शिंदे यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्तीही करण्यात आली

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!