टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची एकमताने निवड; कोण आहेत नोएल टाटा?

105 0

ज्येष्ठ उद्योजक, उद्योग अग्रणी रतन टाटा यांचा बुधवारी रात्री दीर्घ आजारानं निधन झालं. रतन टाटा यांच्या निधनानंतर आता टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोण असणार याची चर्चा सुरू झाली होती आज अखेर या प्रश्नाचे उत्तर मिळालं असून रतन टाटा यांचे धाकटे सावत्र बंधू नोएल टाटा एकमतानं निवड करण्यात आली.

कोण आहेत नोएल टाटा?

नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टमध्ये ट्रस्टी आहेत. मागील चाळीस वर्षांपासून टाटा समुहात कार्यरत आहेत. टाटा समुहाच्या अनेक कंपन्यांच्या बोर्डात ते सहभागी आहेत. टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, वोल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आणि टाटा स्टील तथा टायटन कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.

Share This News
error: Content is protected !!