पुण्यात शिवसेनेचा पत्ता कट ?; भाजप आणि अजित पवार गट लढवणार “या” जागा 

258 0

विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर लवकरच आचारसंहिता लागणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पक्षांमध्ये अंतर्गत बैठका, चर्चा सुरू आहेत. दुसरीकडे जागा वाटपाचा तिढाही निर्माण झाला आहे. यातच पुण्यातील जागावाटप नेमकं कसं असेल यावर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पुण्यात भाजपच्या पाच, अजित पवार गटाच्या दोन तर काँग्रेसची एक जागा आहे. त्यामुळे भाजप आणि अजित पवार गटाला विद्यमान आमदारांच्या संख्येत या जागा मिळतील आणि उरलेली एक जागा शिंदे गटाला दिले जाईल अशी अपेक्षा आहे. मात्र याच अपेक्षेचा भंग होण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे पुण्यातून शिंदे गटाचा पत्ता कट होणार का ? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेला उमेदवार दिला जाणार असून शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे हे स्वतः इच्छुक आहेत. अनेक दिवसांपासून ते उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत आहेत. मात्र आता शिंदे गटाला पुण्यातून माघार घ्यावी लागणार असल्याशिवाय चर्चा सुरू झाल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

विधानसभा 2019 ला शिवसेनेला पुण्यात एकही जागा देण्यात आली नव्हती. तसाच प्रकार पुन्हा होऊ शकतो. आणि असं झाल्यास हडपसर मधून इच्छुक असलेले शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांची चिंता मात्र वाढू शकते.

पुणे नाही तर या जागांसाठी आग्रही

पुणे शहरातील एक जागा सोडून जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर या दोन जागांसाठी शिवसेना आग्रही असून या जागांवर शिंदे गट दावा करू शकतं. याबाबतच्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाकडून पुण्यातील दोन जागांसाठी आग्रह केला जात असून हडपसर आणि कोथरूड या दोन्ही जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. या जागांवरून महादेव बाबर, पृथ्वीराज सुतार आणि चंद्रकांत मोकाटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

शहर प्रमुखांचं स्पष्टीकरण

शिंदे गट पुण्यातील एकही जागा लढवणार नसल्याच्या चर्चांवर शहर प्रमुख आणि विधानसभेसाठी इच्छुक असलेले नेते प्रमोद भानगिरे यांनी स्वतः स्पष्टीकरण देत पक्षाकडून पुण्यातील तीन जागा लढवल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता शिंदे गटाला तीन जागा दिल्या जातात का ? आणि कोणत्या तीन जागा दिल्या जातात ? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Share This News
error: Content is protected !!