मला काही झालं तर संजय पांडे जबाबदार असतील ; मोहित कंबोज

396 0

राज्यात सध्या हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असतानाच राजकीय नेत्यांवर हल्लासत्र सुरू झाले आहे नुकताच भाजपनेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता त्यानंतर काल माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर देखील हल्ला करण्यात आला.

हल्ल्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी खळबळजनक ट्विट केले असून या ट्विटमध्ये कंबोज म्हणतात गेल्या ६ महिन्यांपासून मी मुंबई पोलिस आयुक्तांना माझ्या सुरक्षेबाबत अगणित पत्रे लिहिली आहेत.

पण आजतागायत पोलिस दलाकडून कोणताच प्रतिसाद आलेला नाही. मला रोज धमक्या येतात. माझ्यावर हल्लेही होतात, हे जंगलराजच आहे, जिथे लोकांचे ऐकले जात नाही!, यादरम्यान जर मला काहीही झाले तर त्याचे उत्तर संजय पांडे यांना उत्तर द्यावे लागले, असा इशारा कंबोज यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या ट्विटमुळे आता संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होणार का अशी चर्चा सुरु आहे.

 

Share This News
error: Content is protected !!