गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय-नाशिक’च्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  उद्घाटन

400 0

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय, नाशिक नवीन प्रशासकीय इमारत, वसतीगृह, भोजनालय संकूलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार हिरामण खोसकर, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाची नवीन इमारतीची रचना :

प्रशासकीय इमारत तीन मजली असून या इमारती मध्ये आठ प्रशिक्षण वर्ग, सि.सि.टी.एन.एस. प्रयोगशाळा, न्यायवैद्यक,अंगुलीमुद्रा प्रयोगशाळा, स्टुडीओ, वाचनालय,सभागृह, प्राचार्य, उप प्राचार्य, पोलीस निरीक्षक, मंत्रालयीन कर्मचारी यांचे कक्ष, स्वच्छतागृह व इंटरनेटसह अद्ययावत सुविधा देण्यात आल्या आहेत. वसतीगृह इमारत आठ मजली असून या इमारती मध्ये प्रशिक्षणार्थी यांचे निवासाचे सुविधेकरीता 114 रुम ( प्रत्येक रुम मध्ये 2 प्रशिक्षणार्थी ) आहेत. प्रत्येक रुम मध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह, गिझर, कॉट, टेबल, खुर्ची इत्यादी सुविधा देण्यात आल्या आहेत. भोजनालय इमारती मध्ये एका वेळी 200 प्रशिक्षणाथींच्या भोजनाची व्यवस्था असून भोजन तयार करण्यासाठी सौर उर्जेव्दारे गरम पाण्याच्या सुविधेसह नविन तंत्रज्ञानाची साधनसामुग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावेळी वसतीगृह व भोजनालयाची पाहणी केली. तसेच यावेळी या प्रकल्पाशी संबंधितांचा सत्कार यावेळी करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये पोलीस उपायुक्त (गुन्हे) पुणे शहर श्रीनिवास घाडगे, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व विकास महामंडळ मुंबईच्या अधीक्षक अभियंता अनिता परदेशी, वास्तुविशारद सुप्रिया पाध्ये, अभिजित बनकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

Share This News

Related Post

देव तुम्हाला तुमची वैचारिकता सुधारण्याची सद्बुद्धी देवो ! ; नाना पटोले यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका

Posted by - May 27, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य…
sushma andhare and neelam gorhe

Sushma Andhare : ‘तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल पण माफी मागणार नाही’, सुषमा अंधारेनी नीलम गोऱ्हेंना लिहिले पत्र

Posted by - December 23, 2023 0
पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर हक्कभंग दाखल करण्याचे निर्देश दिले.…
Kolhapur News

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापूरमध्ये गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

Posted by - January 17, 2024 0
कोल्हापूर: कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये गर्भलिंग निदान आणि अवैध गर्भपाताच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला…
Mumbaicha dabewala

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार नाही; मुंबईच्या डबेवाल्यांचा मोठा निर्णय

Posted by - October 24, 2023 0
मुंबई : दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) आधी ठाकरे गटासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या मेळाव्याला न जाण्याचा निर्णय…

साफसफाई काम सुरू असताना मोशी औद्योगिक वसाहतीत स्फोट ; 8 जण जखमी

Posted by - March 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड  टाउनशिपमधील मोशी परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट झाला.यात आठजण किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *