अमित शहा यांनी आमच्या…; मनोज जरांगे पाटलांची थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर जहरी टीका

170 0

छत्रपती संभाजीनगर: राज्यात मागील अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीन जोर धरला असून आतापर्यंत तब्बल आठ वेळा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण देखील केला आहे.

नुकतंच मनोज जरांगे पाटील यांनी नऊ दिवसांचा आमरण उपोषण केल्यानंतर आता त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

असं असतानाच काही दिवसांपूर्वी भारताचे गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी छत्रपती संभाजी नगर मध्ये सामाजिक आंदोलन कशी हाताळायचे हे आम्हाला माहिती आहे आम्ही गुर्जर आंदोलन हाताळला पटेल आंदोलन हाताळलं तसंच आम्ही मराठा आंदोलनही हाताळू शकतो असं विधान केलं होतं.

या विधानाचा आज मनोज जरांगे पाटील यांनी समाचार घेतला असून अमित शहा यांनी मराठा समाजाच्या नादाला लागू नये सरकारला ओबीसीतून मराठा आरक्षण द्यावेच लागेल असं विधान केलं आहे.

Share This News
error: Content is protected !!