घरात घुसून खून, दागिनेही केले लंंपास, प्रथमदर्शी दरोडा वाटणाऱ्या गुन्ह्यात समोर आली धक्कादायक माहिती; पत्नीनेच पतीचा… ?

120 0

मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार करून एकाची हत्या करून त्याच्या घरातील दागिने, रोख रक्कम, किंमती वस्तू लुटून पसार झाल्याची धक्कादाय घटना पुण्यामध्ये घडली. प्रथमदर्शी हा दरोडा असल्याचे वाटत होते मात्र खरं तर हा एक ‘फुल प्लॅन मर्डर’ होता, हे उघडकीस आलं आहे.

राहुल पंढरीनाथ निवगुंणे (वय ४२, रा. फुलश्री सोसायटी, कर्वेनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी वाहनावर चालक म्हणून काम करणारे निवगुंणे हे आपल्या पत्नी आणि तीन मुलींसह घरामध्ये झोपले होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोणीतरी दार वाजवले. इतक्या रात्री कोण आलं हे पाहण्यासाठी निवगुंणे स्वतः उठले व दार उघडलं. पुढे काही कळायच्या आत दारात उभे असलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्यावर वार केले. आणि थेट घरात घुसून दागिने, रोख रक्कम आणि किमती वस्तू घेऊन पसार झाले. ही सगळी घटना निवगुंणे यांची पत्नी आणि लहान मुलींसमोरच घडली. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता.

वरवर पाहता हा दरोडा वाटत होता. या प्रकरणाची वारजे पोलीस ठाण्यात निवगुंणे यांच्या पत्नीने घडलेला घटनाक्रम सांगत फिर्याद दिली. त्या आधारावर पोलिसांनी तक्रार दाखल केली व तपास सुरू केला. मात्र तपासात जे काही पोलिसांच्या समोर आलं ते पोलिसांनाही हादरवून टाकणार होतं. हा केवळ दरोडा नसून अनैतिक संबंधातून झालेली हत्या असल्याचं तपासात निष्पन्न झालं.

या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलीस व गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पंचनामा करत असताना पोलिसांना काही गोष्टी खटकल्या. त्या अनुषंगाने त्यांनी हा केवळ दरोडा आहे की घातपात आहे या दृष्टीने तपास केला. याच तपासातून हा दरोडा नसून खून असल्याचं स्पष्ट झालं. मयत निवगुंणे यांच्या पत्नीनेच आपल्या बॉयफ्रेंड च्या मदतीने नवऱ्याला संपवले. या प्रकरणी आरोपी पत्नीसह तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!