सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

210 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रोज नवे-नवे दावे होताना पाहायला मिळत आहेत.

महायुतीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच असल्याच्या चर्चा सातत्याने समोर येत आहेत.

तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक चर्चेला आहे.

अशातच सातत्याने राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मुख्यमंत्री मिळावी अशी आग्रही मागणी ही होताना पाहायला मिळते. यावेळी महिला मुख्यमंत्री म्हणून खासदार सुप्रिया सुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे भाजपाकडून पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत येतं.

सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख माजी कृषी व संरक्षण मंत्री शरद पवार यांना विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सुप्रिया सुळे यांना राज्यापेक्षा संसदेमध्ये काम करण्यात अधिक रस आहे. संसदेमध्ये सुप्रिया सुळे यांची उपस्थिती 95% हून अधिक आहे असं शरद पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!