Breaking News
Dagdushet Ganpati

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; बेलबाग चौकातून बाप्पा मार्गस्थ p

578 0

पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणेशोत्सव राज्यभरात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून पुण्यातही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

पुण्यासह संपूर्ण देशभरात आकर्षण असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून बेलबाग चौकातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मार्गस्थ झाला आहे.

विसर्जन मिरवणूक वेळेत आणि लवकर संपवावी या उद्देशाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं मागील वर्षापासून दुपारी चार वाजता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी देखील दुपारी चार वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी सहभागी झाला आणि बेलबाग चौकातून बाप्पाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ झाली.

 

Share This News
error: Content is protected !!