पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणेश विसर्जन. राज्यभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत असून पुण्यामध्येही विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
आज सकाळी आठ वाजता परंपरेप्रमाणे पुण्यातील मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपतीची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली आणि ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघाली होती.
दुपारी चारच्या सुमारास हा गणपती अलका टॉकीज चौकात पोहोचला आणि साधारणतः साडेचार च्या सुमारास गणरायाचं विसर्जन करण्यात आलं.