Breaking News
Bhausaheb Rangari Ganpati

विसर्जन मिरवणुका पाहायला जाताय ? वाचा कोणते रस्ते चालू, कोणते बंद, कुठे असणार नो पार्किंग?

654 0

उद्या गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. पुण्यात विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे पुणे शहरात वाहतुकीला मोठे अडथळे निर्माण होतात. या अनुषंगाने भाविकांना आणि वाहतुकीला अडथळे येऊन नयेत यासाठी पुणे पोलिसांच्या वतीने वाहतुकीच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते बंद ठेवून इतर रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात आली असून पार्किंग आणि नो पार्किंग साठीचे परिसर पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी बाहेर पडताना किंवा आपल्या कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना वाहतुकीच्या बदलांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. पुण्यातील नेमके कोणते रस्ते बंद राहणार? आणि पर्यायी मार्ग कोणते? गाडी पार्क कुठे करायचे वाचा सविस्तर.

पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड, शिवाजी रोडसह शहरातील प्रमुख 17 रस्ते बंद राहणार आहेत. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सकाळी नऊ वाजता सुरुवात होणार असल्याने सकाळपासूनच हे रस्ते बंद राहणार असून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हे रस्ते बंद ठेवले जाणार आहेत. हे रस्ते वाहतुकीसाठी बंद असून आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब त्वरित पोहोचण्यासाठी बंद असलेल्या रस्त्यांवरूनही मार्ग करून दिले जाणार आहेत.

“हे” 17 रस्ते बंद

लक्ष्मी रोड – लक्ष्मी रोड संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत बंद राहणार.

बाजीराव रोड – बाजीराव रोड सावरकर चौक ते फुटका बुरूज चौकापर्यंत बंद राहणार.

टिळक रोड – टिळक रोड जेधे चौक ते अलका टॉकिज चौकापर्यंत बंद राहणार.

शिवाजी रोड – शिवाजी रोड काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौकापर्यंत बंद राहणार.

कुमठेकर रोड – कुमठेकर रोड टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौकापर्यंत बंद राहणार.

गणेश रोड – गणेश रोड दारूवाला पुल ते जिजामाता चौकापर्यंत बंद राहणार.

केळकर रोड – केळकर रोड बुधवार चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत बंद राहणार.

फर्ग्युसन रोड- फर्ग्युसन रोड खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेटपर्यंत बंद राहणार.

शास्त्री रोड – शास्त्री रोड सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौकापर्यंत बंद राहणार.

जंगली महाराज रोड – जंगली महाराज रोड झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत बंद राहणार.

भांडारकर रोड – भांडारकर रोड पी.वाय.सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौकापर्यंत बंद राहणार.

कर्वे रोड – कर्वे रोड नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौकापर्यंत बंद राहणार.

पुणे-सातारा रोड- व्होल्गा चौक ते जेधे चौकापर्यंत बंद राहणार.

प्रभात रोड – प्रभात रोड डेक्कन पोस्टे ते शेलारमामा चौकापर्यंत बंद राहणार.

पुणे- सोलापूर रोड – सोलापूर रोड सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौकापर्यंत बंद राहणार.

बगाडे रोड – बगाडे रोड सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौकापर्यंत बंद राहणार.

गुरू नानक रोड – गुरू नानक रोड देवजीबाबा चौक ते हमजेखाना चौक ते गोविंद हलवाई चौकापर्यंत बंद राहणार.

या प्रमुख 17 रस्त्यांवरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून काही रस्त्यांवरून वाहतूक वळवण्यात आलीच आहे.

लक्ष्मी रोड – संत कबीर पोलिस चौकी

बाजीराव रोड – सावरकर पुतळा चौक

जंगली महाराज रोड – झाशी राणी चौक

शिवाजी रोड – काकासाहेब गाडगीळ पुतळा

सोलापूर रोड – सेव्हन लव्हज चौक

मुदलीयार रोड – अपोलो टॉकीज/ दारूवाला पुल

सातारा रोड – व्होल्गा चौक

फर्ग्युसन कॉलेज रोड – गुडलक चौक

लाल बहादुर शास्त्री रोड – सेनादत पोलिस चौकी

कर्वे रोड – नळस्टॉप

गणेशोत्सव मिरवणुका पाहण्यासाठी पुण्यात लाखो लोक रस्त्यावर येत असतात. या लोकांना वाहतुकीचा किंवा पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या वाहनांचा त्रास होऊ नये. यासाठी सर्व खाजगी वाहनांना अनेक रस्त्यांवर नो पार्किंग करण्यात आले आहे.

नो पार्किंग कुठे ?

लक्ष्मी रोड – संत कबीर चौक ते अलका टॉकीज चौक

टिळक रोड – जेधे चौक ते अलका टॉकीज चौक

केळकर रोड – बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक

बाजीराव रोड – पुरम चौक ते फुटका बुरुज चौक

कुमठेकर रोड – शनिपार चौक ते अलका टॉकीज चौक

जंगली महाराज रोड – झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक

फर्ग्युसन रोड – खंडोजी बाबा चौक ते गुडलक चौक

शिवाजी रोड – गाडगीळ पुतळा ते जेधे चौक

कर्वे रोड – नळस्टॉप ते खंडोजीबाबा चौक

शास्त्री रोड – सेनादत्त पोलीस चौकी ते अलका टॉकीज चौक

Share This News
error: Content is protected !!