Breaking News

जया किशोरी यांच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

595 0

 

पुणे : भारतातील प्रसिध्द आध्यात्मिक कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट देऊन बाप्पाची आरती केली. यावेळी उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन व भाविक उपस्थित होते.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’च्या दर्शनासाठी हजारो भक्तांबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत आहेत. रात्री आठ वाजता बाप्पाची आरती असते. यावर्षी ट्रस्टने बाप्पाची रात्रीची आरती प्रामुख्याने आधात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा हस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी आध्यात्मिक कथाकार तथा प्रसिद्ध भजन गायिका जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली. यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी किशोरी यांचे मोदकाची प्रतिकृती देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपतीच्या आरतीचा मान दिल्याबद्दल ट्रस्टचे आभार मानले. दरम्यान आरती कार्यक्रमाआधी ढोल-ताशा पथकाने केलेल्या वादनाचाही जया किशोरी यांनी आनंद घेतला आणि त्या अक्षरशः त्यात दंग होऊन गेल्या होत्या.

Share This News
error: Content is protected !!