तुरुंगातून सुटलेल्या भावाला भेटायला जाताना व्यावसायिकाच्या डोक्यात कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

273 0

पुण्यात दररोज कोयता हल्ल्याच्या घटना घडताना दिसत आहे. पोलिसांनी अनेक प्रयत्न करूनही हे हल्ले रोखण्यात आणि गुन्हेगारांवर दबाव बनवण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. अशीच एक कोयता हल्ल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी फेज तीन, गवारवाडी येथे घडली.

जेलमधून सुटलेल्‍या भावाला भेटण्‍यासाठी चाललेल्‍या एका तरुणावर कोयत्‍याने वार करण्यात आले. विशाल प्रकाश देवकर (वय 30, रा. घोटावडे, ता. मुळशी जि.पुणे) असे हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून याच पीडित तरुणाने हिंजवडी पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल देवकर हे बांधकाम व्‍यावसायिक आहेत. रविवारी रात्री नऊ वाजताच्‍या सुमारास ते तुरुंगातून सुटलेल्‍या आपल्या भावाला भेटण्‍यासाठी दुचाकीवरून जात होते. त्याचवेळी बापुजीबुवा मंदिराजवळ त्‍यांना पाच-सहा जणांच्या टोळक्याने अडवून ठेवले. यांपैकी एक आरोपी असलेल्या साधु कापसे याने त्यांना मारहाण केली. त्याचवेळी देवकर यांनी पळून जाण्याचे प्रयत्न केले. मात्र आरोपींनी त्यांना मागून डोक्यात कोयत्याने वार केले. यात पीडित तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

तर या प्रकरणी अक्षय साधु कापसे (वय 29), मनोहर साधु कापसे (वय 35), साधु कापसे (सर्व रा. हिंजवडी), अमोल सुदाम धुमाळ आणि निलेश सुदाम धुमाळ (रा. धुमाळवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!