बीड : अंबाजोगाईत ट्रक-जीपचा भीषण अपघात; सात प्रवासी जागीच ठार

459 0

बीडच्या अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात प्रवासी जागीच ठार झाले आहेत.

हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला. अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लातूर मधील आर्वी येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने येत होते. दरम्यान सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यात पाच महिला व एक बालक जागीच ठार झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह व जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!