राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा गोळीबारात मृत्यू,12 तासाच्या आत पोलीसांनी आरोपींना घेतलं ताब्यात; हत्येचा कारण नेमकं काय होतं?

304 0

पुणे: राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या गोळीबार प्रकरणी आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुणे पोलिसांकडून आरोपींना अटक करण्यात आली आहे. .

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास वनराज आंदेकर यांच्यावर नाना पेठ गोळीवार करण्यात आला होता… गोळीबारानंतर वनराज आंदेकर यांच्यावर कोयतांना वार देखील करण्यात आले यामध्ये त्यांची प्रकृती गंभीर बनली त्यांच्यावर केईएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू ते मात्र उपचारांती त्यांचा मृत्यू झाला..

या घटनेच्या अवघ्या बारा तासाच्या आतच पुणे पोलिसांकडून संबंधित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं असून वनराज अंदेकर यांच्या सख्ख्या बहिणी संजीवनी कोमकर,कल्याणी कोमकर दाजी गणेश कोमकर, जयंत कोमकर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

कौटुंबिक आणि जमिनीच्या वादातून हा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे

Share This News
error: Content is protected !!