एकट्यालाच गाठलं अन्….; माजी नगरसेवक वनराज अंदेकरांवरील गोळीबाराची संपूर्ण स्टोरी

226 0

पुणे: पुण्यातून एक मोठी आणि धक्कादाय बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर घरगुती वादातून गोळीबार करण्यात आला.

पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडली असून गोळीबाराबरोबरच वनराज आंदेकरांवर कोयत्याने वार देखील करण्यात आले.

कसा झाला गोळीबार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर एका घरगुती कार्यक्रमात असताना त्यांचे इतर सहकारी त्यांच्यासोबत नव्हते याचाच फायदा घेत वनराज आंदेकर यांच्या चुलत बहिणीचा नवरा बंडू अंदेकर यांचे जावई गणेश कोमकर यांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार गेल्याची माहिती आहे.

त्या गोळीबारानंतर पोलिसांकडून घटनास्थळ सील करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.गोळीबारानंतर आंबेकर यांना तात्काळ पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारांती आंदेकर यांचा मृत्यू झाला.

Share This News

Comments are closed.

error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide