घरगुती कारणातून पुण्यात माजी नगरसेवकावर गोळीबार; गोळीबारात वनराज अंदेकरांचा मृत्यू 

311 0

पुणे: पुण्यातून एक मोठी आणि धक्कादाय बातमी समोर आली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर घरगुती वादातून गोळीबार करण्यात आला.

पुण्यातील नाना पेठेत ही घटना घडली असून गोळीबाराबरोबरच वनराज आंदेकरांवर कोयत्याने वार देखील करण्यात आले.

कोळीबारानंतर आंबेकर यांना तात्काळ पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारांती आंदेकर यांचा मृत्यू झाला.

वनराज आंदेकर यांच्या चुलत बहिणीच्या नवऱ्याने म्हणजे बंडू अंदेकर यांचे जावई गणेश कोमकर यांनी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार गेल्याची माहिती आहे त्या गोळीबारानंतर पोलिसांकडून घटनास्थळ सील करून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Share This News
error: Content is protected !!