Suicide

आई विना भिकारी…. आईच्या जाण्याचं दुःख सहन न झाल्याने उच्चशिक्षित बहिण भावाने संपवलं जीवन 

294 0

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी… अशी म्हण आपल्याकडे रुजू आहे. आई विना जगणे ही गोष्ट प्रचंड दुःखदायक असते. आईचं जाणं अनेकांना सहन होत आहे. अशीच धक्कादायक घटना कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरात घडली. अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी आईचे निधन झाले होते. मात्र हा विरह सहन न झाल्याने उच्चशिक्षित बहिण भावाने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहरातील संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनीत कुलकर्णी राहत होते. या कुटुंबात आई आणि त्यांची उच्चशिक्षित मुलगी आणि मुलगा राहत होता. हे दोघेही अविवाहित होते. आई पद्मजा निळकंठ कुलकर्णी यांचे मे महिन्यांत निधन झाले. मात्र आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने भूषण निळकंठ कुलकर्णी आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी हे सख्खे बहीण नैराश्यात गेले. आईचा विरह सहन न झाल्याने दोन्ही बहिण भावांनी राजाराम तलावात उडी मारून आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी त्यामध्ये आईच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे लिहिण्यात आले आहे. याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे.

Share This News
error: Content is protected !!