मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले असून जरांगे पाटलांची सध्या शांतता राहिली सुरू आहे. राज्य सरकारकडून जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं गेल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी म्हणून जरांगे पाटलांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये 29 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाची बैठक होणार असून या बैठकीमध्ये निवडणूक लढायची की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे जर निवडणूक लढायचा निर्णय झाला तर सर्व मतदार संघामध्ये अपक्ष उमेदवार देण्याची रणनीती मनोज जरांगे पाटलांनी आखली आहे
विधानसभेसाठीचं राहुल गांधींचं प्लॅनिंग विरोधकांची डोकेदुखी वाढवणार? वॉर रूम प्रभारीपदी केली ‘या’ तरुण खासदाराची नियुक्ती https://www.topnewsmarathi.com/special-for-you/appointed-this-young-mp-as-warroom-in-charge/
 
                         
                                 
                             
                             
                             
                            