पुणेकरांची पुढच्या सहा महिन्याची पाण्याची चिंता मिटली; धरण साखळी प्रकल्पात तब्बल ‘इतका’ पाणीसाठा

359 0

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात पावसाची संततधार सुरू असून रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत 48.17% म्हणजेच 14. 04 टीएमसी पाणीसाठा जमा झाल्यानंतर पुढील सहा महिने पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

जून मध्ये पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर जुलै महिन्यात पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील खडकवासला टेमघर पानशेत आणि वरसगाव या धरणांमध्ये पाऊस बरचण्यास सुरुवात झाली यामुळे पाण्याची पातळी वाढली होती धरण प्रकल्पात एक जुलै रोजी 4.24 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता जुलैमध्ये आतापर्यंत पडलेल्या पावसामुळे पाणी पातळी वाढली असून अवघ्या 20 दिवसात यामध्ये दहा टीएमसी ची भर पडली आहे आणि त्यामुळे पुणेकरांची पुढील सहा महिन्यासाठी ची पाण्याची चिंता मिटली आहे.

रविवारी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत टेमघर धरणात 25 मिलिमीटर पानशेत आणि वरसगाव मध्ये प्रत्येकी 15 मिलीमीटर खडकवासल्यात एक मिलीमीटर पाऊस झाला त्यामुळे पाणीसाठा 14.04 टीएमसी पर्यंत पोहोचला असून खडकवासला धरण 73% पर्यंत पानशेत धरण 55.32 टक्के टेमघर आणि वरसगाव धरण प्रत्येकी 40% भरले असून गेल्या वर्षी याच दिवशी खडकवासला धरण साखळी प्रकल्पात 13.39% पाणीसाठा होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!