पुण्यात महिला सुरक्षित आहेत का ? कंटेंट क्रियेटर महिलेला ओव्हरटेक करून कारचालकाची दिवसाढवळ्या मारहाण

310 0

पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अपघात बघता पुण्यात खरंच महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तशीच एक गंभीर घटना आज पुन्हा पुण्यामध्ये घडली. पुण्यातील बाणेर-पाषाण लिंक रोडवर जेरीलीन डिसिल्वा नावाची महिला दोन लहान मुलांबरोबर वाहन चालवत जात होती. यावेळी तब्बल दोन किलोमीटर लांब पर्यंत एका वृद्ध कारचालक आणि तिचा पाठलाग केला. अनेकदा तिला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न देखील केला. आणि अखेर काही अंतरावर तिला ओव्हरटेक करून आपली कार थेट तिच्या गाडी समोर उभी केली व त्यानंतर गाडीतून खाली उतरून थेट जेरीलीन हिला मारहाण केली. ज्यात तिच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत‌. तिच्या नाका मधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव देखील झाला.

 

दरम्यान, जेरीलीन ही एक कंटेंट क्रियेटर असून जखमी अवस्थेत एक व्हिडिओ बनवून तिने स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे ही घटना उघड झाली आहे. जेरीलीनचे इंस्टाग्राम वर 71 हजार फॉलोवर्स आहेत. ती मनोरंजनात्मक कंटेंट इंस्टाग्राम वर पोस्ट करते. आपल्याबरोबर घडलेल्या धक्कादायक घटनेची माहिती देतानाचा व्हिडिओ देखील तिने पोस्ट केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी देखील केली. या संदर्भात जेरीलीन पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. त्यानंतर पुणे पोलिसांना या घटनेचा तपास करून आरोपीला पकडण्यात यश मिळते का याकडे सध्या सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. त्याचबरोबर या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यात दिवसाढवळ्या तरी महिला सुरक्षित आहेत का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!