शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती १००८ यांनी घेतले ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन

508 0

 

 

पुणे : बद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील परमाराध्य परमधर्माधिश अनंत श्री विभूषित उत्तराम्नाय ज्योतिष पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले. शंकराचार्यांनी श्रीं ची आरती देखील केली.

यावेळी पं. वसंतराव गाडगीळ, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त केशव विध्वंस, दगडूशेठ गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ पायमोडे, सुनील जाधव, जितेंद्र चिंचोरकर, विजय चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शंकराचार्यांनी ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती देखील जाणून घेतली. शंकराचार्य महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेकरिता पुण्यात आले असताना त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

बद्रिनाथ ज्योर्तिमठ येथील परमाराध्य परमधर्माधिश अनंत श्री विभूषित उत्तराम्नाय ज्योतिष पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामिश्री अविमुक्तेश्वरानंद: सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे मोठया उत्साहात मंदिरात स्वागत करण्यात आले. शंकराचार्यांनी श्रीं ची आरती देखील केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!