Car Accident

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

565 0

बीड : बीडमधून अपघाताची एक भीषण घटना (Car Accident) समोर आली आहे. यामध्ये कार अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता, की अपघातग्रस्त कार रस्ता सोडून थेट बाजूच्या शेतात जाऊन पलटी झाली. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला असून तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. बीड – अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराजवळील चऱ्हाटा परिसरामध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये भरधाव कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

चालकाचं नियंत्रण सुटताच भरधाव कार रस्ता ओलांडून थेट दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात पलटी झाली. या अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू झाला आहे.ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. समोर कुठलंही वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, अवघ्या पाच सेकंदात भरधाव कारचा हा भीषण अपघात झाला आहे.

पुण्यात भरधाव कारने दोघांना चिरडलं
पुण्यातील कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबर प्लेट नसलेल्या पोर्श कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दोन आयटी अभियंत्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर ज्या पोर्शे कारने दोघांना धडक दिली ती कार विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता.या अपघातानंतर आरोपी मुलाला जमावाने बेदम चोप दिला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!