khadakwasla dam'

Pune News : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! पुण्यातल्या धरणांमध्ये किती पाणीसाठा उपलब्ध?

348 0

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. पुण्यातही तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. पुण्यातील उपनगरांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची आत्ताची पाणी पातळी पाहता किती दिवसांसाठीचा पाणी साठा उपलब्ध आहेआणि पाणीटंचाईचे हे सावट कधी दूर होणार असा प्रश्न पडला आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांची क्षमता किती?
पुण्यातील खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे तर टेमघर धरणाची क्षमता 3.71 टीएमसी, पानशेत धरणाची क्षमता 10.65 टीएमसी असून पुण्याला पाणीपुरवठा करणारं सगळ्यात मोठ धरण म्हणजेच वरसगाव धरणाची क्षमता 12.82 टीएमसी इतकी आहे. तर या क्षमतेच्या तुलनेत सध्या खडकवासला धरणात 1.21 टीएमसी, पानशेत धरणात 2.02 टीएमसी, टेमघर धरणात 0.49 तर वरसगाव मध्ये 3.28 इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

पुण्याला केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे. खडकवासला धरणात 61.50%, पानशेत धरणात 18% टेमघर धरणात पाच टक्के तर वरसगाव मध्ये जवळपास 26% पाणीसाठा आहे. म्हणजेच पुण्याकडे सध्या 6.70 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. म्हणजे केवळ 23 टक्के वापरासाठीचे पाणी उपलब्ध आहे. मागच्या वर्षी पाऊस कमी झाल्याने यंदा धरणातली पाणी पातळी लवकर कमी झाली आहे. शिल्लक राहिलेल्या या 23 टक्के पाणीसाठ्याचं नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. इतर धरणातून पाणीपुरवठा करून 15 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा खडकवासला धरणात राखीव ठेवला जाणार आहे.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी सध्या प्रति व्यक्ती 270 लिटर पाण्याचा वापर होत आहे तो वापर कमी करून 150 लिटर प्रति व्यक्ती इतका करावा असं आवाहनही पुणेकरांना केलं आहे. पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या पेठांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर रित्या जाणवत नाही. मात्र धायरी, हडपसर, मुंडवा, खडकी अशा उपनगरांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे ज्या प्रकारे प्रशासन पाणीपुरवठ्याचं नियोजन करत आहे तसंच पुणेकरांनीही पाणी जपून वापरण्याची गरज निर्माण झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : पुण्यात लोकसभा निवडणुकीतील ‘हा’ उमेदवार प्रचार खर्चात अव्वल; तर ‘या’ उमेदवाराने केला सर्वात कमी खर्च

Pune News : धक्कादायक! पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पेलणाऱ्या पुणे पोलिसांनाच “आव्हान”

Maharashtra Weather : राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weight Loss : वजन कमी करणं झालं इतक सोपं ; वजन कमी करण्यासाठी फॉलो करा ‘या’ ५ सोप्या टिप्स

Sunil Chetri Retirement : फुटबॉल पटू सुनील छेत्रीने घेतली निवृत्ती; सोशल मीडिया द्वारे दिली माहिती

Pune News : भाजपाचे माजी आमदार विश्वास गांगुर्डे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!