punit balan

Punit Balan : अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवेद्य

315 0

पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या मूर्तीला आंब्याचा नैवद्य दाखविण्यात आला.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या देखावा मंदिरात हा मोहत्सव साजरा करण्यात आला. या मोहत्सवनिमित्त निमित कझाकस्तान (अस्ताना) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेला एम.आय.जी.एस. बॉक्सिंग क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू आकाश गोरखा आणि कोच उमेश जगदाळे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली तसेच याप्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. भूषण राख हे देखील उपस्थित होते, डॉ. यांचे वैशिष्टे म्हणजे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस कन्या रत्न झाले तर प्रसूतीचा संपूर्ण खर्च ते स्वतः करतात. त्यांचे समाजिक कार्य हे आदर्श असून इतरांसाठी दिशादर्शक आहे. त्यांचे हे कार्य असेच अक्षय्य राहो, अशी यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणेशा चरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. संजीव जावळे यांच्यासह ट्रस्टी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘‘आंब्याच्या हंगामात बाप्पाला दाखवण्यात येणारा आंब्याचा नैवेद्य हा भाविकांसह सर्वांसाठी एक मोठा उत्सव असतो. हाच नैवेद्य उद्या येरवडा येथील बालग्राम सोसा. चिल्ड्रन व्हिलेज आणि महर्षीनगर येथील बाल शिक्षण मंच या सामाजिक संस्थेतील विद्यार्थांना प्रसाद म्हणून दिला जाईल. बाप्पाच्या माध्यमातून भाविकांची आणि समाजाची सेवा करण्याचं भाग्य मिळतंय, याचा मनापासून आनंद वाटतो.’’असे कोट पुनीत बालन यांनी केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : राज्यातील ‘या’ भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी; हवामान खात्याने दिला इशारा

Pune Loksabha : 13 मे रोजी होणार पुण्यात मतदान; मतदानबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Viral Video : धक्कादायक!भाजप नेत्याच्या लहान मुलाने केले मतदान; व्हिडिओ Viral झाल्यावर देशात खळबळ

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Pune News : खळबळजनक ! पुण्यातील एनडीए परिसरात खोदकाम करताना आढळला बॉम्ब; जंगलात नेवून केला स्फोट

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!