Pune Crime

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

518 0

पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुन्हा एकदा कोयता गॅंगची दहशत पाहायला मिळाली. पुण्यातील लोहगावच्या डीवाय पाटील इंजिनियरिंग कॉलेजमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली आहे. कोयता-लाठ्याकाठ्या घेऊन 2 गटांमध्ये तुफान राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये ही हाणामारी झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पुण्याच्या लोहगावात असलेल्या डी.वाय पाटील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी चक्क कोयत्याने मारामारी केली आहे. विद्यार्थ्यांच्या 2 गटांमध्ये हा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये चक्क कोयते घेऊन विद्यार्थ्यांनी एकमेकांवर हल्ला केला आहे. दीघी पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात हा संपूर्ण प्रकार घडल्याने तणावाचं वातावरण आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोयता आणि अशा प्रकारची गुंडगिरी झाल्याने चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. विद्येचं माहेरघर पुण्यनगरीत चाललंय तरी काय? मुलं शिकायला येतात की गुंडगिरी करायला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!