Gadchiroli News Murder

Parbhani Crime : महाराष्ट्र हादरला ! प्रेमाला विरोध करत आई-वडिलांनी पोटच्या लेकीची केली हत्या

459 0

परभणी : महाराष्ट्रातील परभणीमधून (Parbhani Crime) एक हादरवणारी घटना समोर आली आहे. प्रेम विवाहाला विरोध करत आई-वडिलांनीच पोटच्या मुलीची गळा आवळून हत्या केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. परभणीच्या पालम तालुक्यातील नाव्हा या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नाव्हा गावातील 19 वर्षीय तरुणीचे गावातीलच अन्य जातीतील तरुणावर प्रेम होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मुलीने आंतरजातीय विवाह करू नये, म्हणून पालकांनी तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ती आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यातूनच 21एप्रिलच्या रात्री आईवडिलांनी तिची हत्या केली. हत्येनंतर आरोपी आईवडिलांनी अत्यंत थंड डोक्याने त्याच रात्री कोणालाही ही गोष्ट समजू न देता भावकीतील मोजक्या लोकांना सोबत घेत तरुणीच्या मृतदेह गावातील स्मशानभूमीत नेऊन जाळला व पुरावा नष्ट केला.

ही गोष्ट उघडकीस येताच पोलिसांनी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृत तरुणीचे आई, वडील आणि भावकीतील इतर सहा जण अशा एकूण 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News
error: Content is protected !!