Devendra Fadanvis Tension

Maharashtra Politics : ‘फडणवीसांविरोधात रचण्यात आला होता कट’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

456 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून (Maharashtra Politics) एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे केलेल्या एका खळबळजनक दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी केला होता. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे, तयार राहा असेदेखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

नेमके काय म्हणाले मोहित कंबोज ?
भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नव्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी ट्विट करत केला आहे. मोहित कंबोज यांचा रोख हा शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसकडे असल्याचं या ट्विटच्या माध्यमातून दिसत आहे. या कटात राष्ट्रवादी काँग्रेसची महिला नेता, आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराचा या कटात समावेश असल्याचा दावाही कंबोज यांनी केला आहे. लवकरच मोठा गौप्यस्फोट करणार आहे, तयार राहा असंही मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे.

भाजप नेते मोहित कंबोज हे पुन्हा एकदा या ट्विटमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मोठा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.तसेच ते नेमका काय गौप्यस्फोट करणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Manifesto : बीबीसी न्यूज मराठीचा महिलांसाठीचा ‘ती’चा जाहीरनामा प्रकशित

KPK Jeyakumar : खळबळजनक ! 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ‘त्या’ काँग्रेस नेत्याचा आढळला मृतदेह

Ahmednagar Accident : अहमदनगरमध्ये एसटीचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!