Eknath And Devendra

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

313 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पादेखील पार पडला. मात्र या दरम्यान 1 जागा अशी आहे त्याचा अद्यापही तिढा सुटायचं नाव घेईना. या जागेसाठी 3 जण इच्छुक आहेत? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हि जागा कोणती आहे? तर ही जागा आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ…

काय आहे नेमका तिढा?
दक्षिण मुंबईतून भाजपच्या काही नावांची चर्चा होती मात्र आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी दक्षिण मुंबईत निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून अद्याप प्रचार सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा हे दोघेही दक्षिण मुंबईतून लढण्यासाठी इच्छुक आहेत.

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत मैदानात असणार आहेत. एका बाजुला उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका सुरु असताना इच्छुक नेत्यांकडून प्रचार सुरु असल्याने नेमका उमेदवार कोण निश्चित होणार याचा सस्पेन्स कायम आहे. यामुळे आता हि जागा शिंदे गटाकडे जाते कि भाजपकडे जाते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ruturaj Gaikwad : धोनीला ‘जे’ 17 वर्षांत जमलं नाही ‘ते’ ऋतुराजने पहिल्याच वर्षांत केले

RBI : आरबीआयची आणखी एका बँकेवर कारवाई ! ‘या’ बँकेतून ग्राहकांना काढता येणार नाही पैसे

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील सभेची जागा बदलली; आता ‘या’ ठिकाणी होणार सभा

Shikhar Bank Loan Case : शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!