पुणे : शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणी (Shikhar Bank Loan Case) अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह इतर आरोपींना क्लीन चीट देण्यात आली आहे. यामुळे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तपास यंत्रणेने जानेवारी महिन्यात शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट जारी केला होता. बँकेच्या कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीत अनियमितता असल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र कर्ज वाटप आणि साखर कारखाने विक्रीमुळे बँकेला नुकसान झाल्याचे पुरावे उपलब्ध नसल्याचं क्लोजर रिपोर्टमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने म्हंटले आहे.
सविस्तर माहिती अशी कि, शिखर बँकेच्या कामकाजाची नाबार्डनं 2007 ते 2011 दरम्यान तपासणी केली होती. त्यानंतर बँकेने उपलब्ध केलेल्या अहवालातील तपशीलाच्या पार्श्वभूमीवर जानेवारी 2013 मध्ये बँकेच्या कामकाजाची चौकशी सुरू करण्यात आली. जानेवारी 2014 मध्ये सहकार आयुक्तांना सादर केलेल्या चौकशी अहवालात बँकेचे नुकसान झाल्याचे म्हटलेलं नाही.
या क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारे, शालिनीताई पाटील तसेच अन्य तक्रारदारांनी विरोध करत प्रोटस्ट पीटीशन कोर्टात सादर केली होती. मात्र मूळ तक्रारदार सुरेंद्रमोहन अरोरा यांच्याशिवाय अन्य कुणाचीही विरोध याचिका स्वीकारण्यास,कोर्टाने नकार दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.