Pune Crime

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

558 0

पुणे : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पुण्यातून (Pune Crime) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये हातात कोयता घेऊन काही तरुणांनी दहशत पसरलवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
पुण्यातील बिबेवाडी परिसरात 40 रुपये उधार ठेवले नाहीत म्हणून गुंडांकडून कोयत्याने मारहाण करण्यात आली आहे. केतन टेमघर असं आरोपीचे नाव आहे. केतन वरती आहेत अनेक गुन्हे दाखल असून खुनाचा गुन्हा देखील त्याच्यावर आहे. सदर गुन्हेगाराची बिबेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यात 4 दिवसात 4 ठिकाणी गोळीबार
पुणे शहरात सलग चार दिवसात घडलेल्या चार गोळीबाराच्या घटना… पुण्यात पहिली घटना घडली जंगली महाराज रोडवर, दुसरी हडपसर मध्ये, तिसरी भुमकर चौक आणि आज पहाटे चौथी घटना घडली पुण्याच्या येरवडा परिसरात.. यामुळे सांस्कृतिक राजधानी असलेली पुण्यनगरी आता पिस्तूल नगरी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!