Pune Firing

Pune Firing : पुणे हादरलं ! पहाटेच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील भूमकर चौकात गोळीबार

564 0

पुणे : आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा पुणे हादरलं (Pune Firing) आहे. दोन दिवसात तीन गोळीबाराच्या घटना घडल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भूमकर चौकात आज पहाटेच्या सुमारास गोळीबार झाला आहे. गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला आहे. यात गणेश गायकवाड जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
पुण्यात सिंहगड रोडवर मध्यरात्री अडीच वाजता गोळीबार झाला. भूमकर चौकात गणेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात गणेश गायकवाड यांच्या खांद्याला गोळी लागली आहे. क्षुल्लक कारणातून हा गोळीबार झाल्याचं सांगण्यात येत आहे. काडीपेटी मागितल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. हि संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!