Salman Khan

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

802 0

मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पहाटे पाचच्या सुमारास दोघे दुचाकीवर बसून आले आणि त्यांनी सलमानच्या घरापुढे अंदाधुंद गोळीबार केल्याचे समोर आले आहे. या गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा गोळीबार कोणी व का केला याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर
दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एकूण 6 राऊंट फायर केले. त्यातील एक गोळी सलमान खानच्या गॅलरीमध्ये मारण्यात आली आहे. दरम्यान गोळीबाराच्या घटनेचा शोध घेण्याकरता फॅारेन्सीक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे, तर एक टीम तांत्रिक तपास करत आहे. ही संपूर्ण गोळीबाराची घटना त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News
error: Content is protected !!