सांगली : महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघामुळे (Sangli Loksabha) तणावाचे वातावरण झाले आहे.शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडे सांगलीतील भाजप नेत्याने पक्षालाच घरचा आहेर देत म्हटले की ‘काँग्रेस सारखी अवस्था व्हायला वेळ लागणार नाही’.
भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भाजपाच्या मंत्री सुरेश खाडे यांच्यासह नेत्यांना खडेबोल सुनावल्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांनी स्वतःच्याच पक्षाला घरचा आहेर दिला आहे.पृथ्वीराज देशमुख हे माजी आमदार आणि सांगलीचे माजी जिल्हाध्यक्ष होते. पृथ्वीराज देशमुख हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्यामुळे त्यांनी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी देखील केली होती. मात्र, विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे वातावरण अधिकच तापले होते.
काय म्हणाले पृथ्वीराज देखमुख?
सांगली लोकसभा निवडणुकाकरिता पलूस येथे बूथ संम्मेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात बोलताना देशमुख बोलले कि “लोकसभेसाठी मी सुद्धा मागणी केली होती. पण आम्हाला बोलवून सांगायला हवं होतं या कारणासाठी तुम्हाला तिकीट देणार नाही.आम्हाला काहीच अडचण नव्हती आणि पक्षावर आमचा आजही राग नाही. पण विश्वासात घेऊन कुणी काम नाही केलं तर काँग्रेसची जशी अवस्था आहे तशी आपली व्हायला वेळ लागणार नाही,” .
पृथ्वीराज देशमुख यांनी सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. ‘पलूस मतदार संघात पक्षाचा कार्यक्रम करून,आमचा कार्यक्रम करून परत निवडणुकीला उभा राहणार आणि आम्ही पक्ष म्हणून मत देणार. आता परत पाच वर्ष तेच करणार असाल तर आम्हाला यावर गांभीर्याने विचार करावा लागेल’, अशी जोरदार टीका पृथ्वीराज देशमुख यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर केली आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Raj Thackeray : महायुतीचा प्रचार कसा करायचा? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना
Murlidhar Mohol : यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ
Narayan Rane : भाजपमध्ये येण्याची ऑफर फडणवीसांनी कशी दिली? नारायण राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल
Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव
Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड
Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या