MNS Raj Thakre

Raj Thackeray : महायुतीचा प्रचार कसा करायचा? राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

712 0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. स्वत:चा आब राखून महायुतीमधील उमेदवारांचा प्रचार करा अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नेमके ‘त्या’ बैठकीमध्ये काय झाले?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना जोमानं कामाला लागण्याचा आदेश दिला आहे. महायुतीचा प्रचार करण्यासाठी आपला आब राखून काम करा. समन्वय समितीत ठरलेला निर्णय कळवण्यात येईल. आवश्यक त्या जबाबदारीचे नियोजन करण्यात येईल. विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे ठेवा. ही लोकसभा निवडणूक म्हणजे आपली विधानसभेची रंगीत तालीम आहे.अधिकाधिक विधानसभा मतदारसंघ बांधणी आपल्याला करायची आहे. लवकरच आपले विधानसभा निवडणूक उमेदवार निश्चित करायचे आहे. प्रचार करताना इतर कुणाच्या आहारी जाऊ नका, अशा सुचनाही राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Murlidhar Mohol : यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी : मुरलीधर मोहोळ

Narayan Rane : भाजपमध्ये येण्याची ऑफर फडणवीसांनी कशी दिली? नारायण राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

Share Market : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी शेअर मार्केट राहणार बंद; स्वतंत्र पत्रक जारी

Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Madha Loksabha : माढ्यामध्ये नवा ट्विस्ट; मोहितेंची एण्ट्री झाल्यास ‘हा’ विश्वासू सोडणार पवारांची साथ?

Junnar Crime : विवाहितेचे झेंगाट सुरु असताना अचानक तिसऱ्याची झाली एंट्री; अन् घडलं भयानक हत्याकांड

Accident News : अहमदनगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Jalgaon News : जळगाव हादरलं ! पत्नी अन् 9 महिन्यांच्या चिमुकलीची हत्या अन् पतीचीही आत्महत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!