Sharad Pawar

Satara Loksabha : शरद पवारांचं ठरलं! सातारा लोकसभेसाठी ‘हा’ उमेदवार देणार?

655 0

सातारा : राज्यातील अनेक जागांवर अजून उमेदवार जाहीर झालेले नाहीत. सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघासाठी सुद्धा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. काही उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. यातच आता या ठिकाणी उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी आरोग्याच्या कारणास्तव निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यातच महायुतीतर्फे या ठिकाणी उदयनराजे भोसले हे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे या जागेवर त्यांच्या तोडीचा उमेदवार देणे गरजेचे होते. अनेक उमेदवाराच्या नावांची चर्चा झाल्यानंतर आता अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच 15 एप्रिल ला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

साताऱ्याच्या या जागेवर काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी अशी शरद पवार यांची इच्छा होती. मात्र चव्हाण हे पवारांच्या तुतारी चिन्हावर लढण्यास तयार नव्हते. त्यामुळे अखेर या जागेवर शिंदे यांची वर्णी लागली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pradeep Sharma : प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जन्मठेपेच्या शिक्षेवर हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय

Pune News : भूताच्या शोधात रात्रभर स्मशानात

Nashik News : भाजप नेत्याच्या घराचे काम सुरू असताना 2 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू

Vijay Shivtare : बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट

Loksabha : लोकसभेच्या ‘त्या’ जागेवरून रणसंग्राम; 25 हजार शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदेंकडे रवाना

IPL 2024 : दिल्ली कॅपिटल्सने घेतला मोठा निर्णय! ‘या’ खेळाडूची संघात होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

Pune Crime : दोस्तीत कुस्ती! खंडणीसाठी मैत्रिणीचे अपहरण करून मित्रांनीच केली हत्या

Maadhavi Latha : चर्चेतील चेहरा : माधवी लता

Pune News : लोकगौरव विशेष सन्मान पुरस्कार; पत्रकारिता क्षेत्रातील सामान्यातील असामान्य कर्तुत्वाबद्दल टॉप न्यूज मराठीचे मुख्य संपादक अजय कांबळे सन्मानित

Gangu Ramsay : बॉलिवूडच्या हॉरर सिनेमांचे मास्टर गंगू रामसे यांचं निधन

Ramdas Athawale : महायुतीत मागितलेल्या जागा न मिळाल्याने रामदास आठवलेंनी केली ‘ही’ मागणी

Nashik Firing : नाशिक हादरलं ! भरवस्तीत टोळक्याकडून फायरिंग

Nagpur News : नागपूरमध्ये भीषण अपघात ! भरधाव ट्रकची 10 पेक्षा अधिक वाहनांना धडक

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!