Maharashtra Election

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

383 0

पुणे : नोकरी शिक्षणानिमित्त पुण्यात (Pune News) आलेले बहुतांश नागरिक पुण्यातच स्थायी होतात. तसेच पुण्याची हवा आल्हाददायक असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून पुण्याला पसंती मिळते मग राष्ट्रपतींपासून अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी निवृत्ती नंतर पुण्याला पसंती दिली आहे त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या 5 हजारांहून जास्त आहे.

पेन्शनरांचे शहर, सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचे माहेरघर अशी पुण्याची वैशिष्ट्ये सांगितली जातात. निवृत्तीनंतर अनेकजण पुण्यात स्थायिक होण्याला पसंती देतात. नोकरी, शिक्षणानिमित्त पुण्यात आलेले बहुतांशी नागरिक पुण्यातच स्थायिक होतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, रोजगार अशा सर्वार्थाने सोयीचे असल्याने राज्यातील आणि देशभरातील नागरिकांचा पुण्याकडे ओढा असतो. पुण्याची हवा आल्हाददायक असल्याने ज्येष्ठ नागरिकांकडून पुण्याला पसंती मिळते. राष्ट्रपतीपदातून निवृत्त झाल्यानंतर प्रतिभाताई पाटील असो किंवा लष्करप्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले अरुणकुमार वैद्य यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना देखील पुण्याची भुरळ पडली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने मतदारयादी जाहीर केली असून त्यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मिळून एकूण 5 हजार 754 एवढे मतदार शतायुषी असल्याचे समोर आले आहे. राज्यात बहुदा पुणे जिल्ह्यातच शंभरीपार केलेले एवढे मतदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितल.

तर पुण्यात 90 ते 120 वयोगटात किती मतदार आहेत पाहुयात
90-99 वयोगटाचे 48,127,
100-109 वयोगटाचे 5722
110-119 वयोगटाचे 22
120 पेक्षा अधिक वयोगटाचे 10 मतदार आहेत.

शंभरीपार केलेल्या मतदारांमध्ये सर्वाधिक 613 मतदार कोथरूड विधानसभा मतदारसंघात आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!