सोलापूर : भाजपने लोकसभेसाठीची आपली पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपने आपल्या धक्कातंत्राचा वापर करत महाराष्ट्रातील युवा नेते राम सातपुते (Ram Satpute) यांना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे तर सुनील मेंढे यांना भंडारा गोंदिया लोकसभेच्या जागेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली-चिमूर मधून तिकीट देण्यात आलंय. अशोक नेते गेले दहा वर्ष गडचिरोलीचे खासदार आहेत. एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना भाजपने सोलापूरात सावध खेळी केल्याचे पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते या युवा तरुण आमदाराला तिकीट दिल्याने आता सोलापुरात प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी होताना दिसणार आहे.
भाजपची यादी. महाराष्ट्रातील 3 मतदरासंघाचे उमेदवार जाहीर
सोलापूर – राम सातपुते
भंडारा गोंदिया – सुनिल मेंढे
गडचिरोली चिमूर – अशोक नेते#BJP #Maharashtra pic.twitter.com/LUGeQL8Iqa— Ramraje Shinde (@ramraje_shinde) March 24, 2024
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास राहिलेल्या राम सातपुते यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून राम सातपुते यांना ओळखलं जातं. अशातच आता राम सातपुते यांना उमेदवारी मिळाल्यानंतर आता सोलापूरची लढत आणखीच रंगतदार होणार आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांचं तगडं आव्हान राम सातपुते यांच्यासमोर असणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Bachchu Kadu : महायुतीच्या अडचणीत वाढ; बच्चू कडू भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवार देणार